आयटी समभाग तेजीतः सेन्सेक्स 255 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवडय़ातील चौथ्या दिवशी गुरुवारी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही निर्देशांकानी विक्रमी कामगिरी करत नवी उंची प्राप्त केली असल्याचे पहावयास मिळाले आहे.
कंपन्यांचे तिमाही अहवाल सादर होत असल्याच्या सकारात्मक वातावरणामुळे देशातील बाजारांनी मजबूत स्थिती प्राप्त केली. यामध्ये दिवसभरात एचडीएफसी बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि एचसीएल टेकमध्ये तेजी राहिल्याने भारतीय बाजार भक्कम स्थितीत राहिला होता.
दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 254.80 अंकांनी वधारुन निर्देशांक 53,158.85 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 70.25 अंकांसोबत निर्देशांक 15,924.20 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये पाच टक्क्यांनी सर्वाधिक तेजीत एचसीएल टेकचे समभाग राहिले असून यासोबत लार्सन ऍण्ड टुब्रो, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी आणि टाटा स्टीलचे समभाग तेजीत राहिले. दुसऱया बाजूला अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एशियन पेन्ट्स, टायटन आणि सन फार्मा यासह अन्य समभाग नुकसानीत राहिले आहेत.
देशातील बाजारात सलग दुसऱया दिवशी आयटी क्षेत्रातील समभागांनी भांडवली बाजाराला नव्या उंचीवर पोहोचविले आहे. अभ्यासकांच्या मते गुंतवणूकदारांना बाजारातील सुधारणात्मक स्थिती दिलासा देण्याच्या तयारीत नाही आहे. तर दुसऱया सत्राच्या दरम्यान आपली भूमिका निभावणाऱया क्षेत्रांनी बाजाराला भक्कम स्थिती प्राप्त करुन दिली असल्याची माहिती आहे.
प्रमुख क्षेत्रांची बाजी
व्यापक पातळीवर पाहिल्यास सिमेंट, रियल इस्टेट आणि फार्मा यांचे समभाग बाजारात मजबूत स्थितीत राहिले आहेत. दुसरीकडे जागतिक पातळीवरील बाजारात आशियातील बाजारांनी सकारात्मक कल प्राप्त केला आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- एचसीएल टेक 1040
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1609
- टेक महिंद्रा…. 1112
- एचडीएफसी बँक 1520
- अल्ट्राटेक सिमेंट 7191
- आयटीसी…….. 206
- टाटा स्टील…. 1256
- ऍक्सिस बँक….. 774
- आयसीआयसीआय 667
- नेस्ले……….. 17618
- इंडसइंड बँक.. 1055
- एचडीएफसी.. 2539
- इन्फोसिस….. 1580
- पॉवरग्रिड कॉर्प. 230
- स्टेट बँक………. 431
- कोटक महिंद्रा. 1750
- डॉ.रेड्डीज लॅब. 5394
- अंबुजा सिमेंट… 385
- डीएलएफ…….. 322
- हिंडाल्को……… 401
- हॅवेल्स इंडिया 1039
समभाग घसरलेल्या कंपन्या
- ओएनजीसी….. 116
- रिलायन्स इन्फ्रा.. 80
- ज्युबिलंट फूड. 3105
- एबीबी इंडिया 1779
- एमआरएफ.. 81559
- ग्लेनमार्क……… 655
- आयशर मोर्ट्स 2666
- कोल इंडिया….. 146
- ल्यूपिन……… 1161
- अरोबिंदो फार्मा 955
- वेदान्ता……….. 269
- ब्रिटानिया….. 3460
- टोरंटो फार्मा.. 2993
- कॅडिला हेल्थ…. 640
- हिरोमोटो…… 2885
- बीपीसीएल….. 447
- सिप्ला………… 973
- पीआय इंडस्ट्रीज 2953
- मारुती सुझुकी 7307
- डाबर इंडिया… 584
- टाटा पॉवर 124