जागतिक बाजारात उत्साह : सेन्सेक्समध्ये 638 अंकांची तेजी
वृत्तसंस्था /मुंबई
आठवडय़ाच्या चौथ्या दिवशी दिवसभरात चढउताराच्या कामगिरीनंतर भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. गुरूवारी दिवसअखेर सेन्सेक्सचा निर्देशांक 638 अंकांनी आणि निफ्टी निर्देशांक 191 अंकांनी मजबूत होत बंद झाला आहे. जागतिक बाजारातही निर्देशांक तेजीत होते.
गुरुवारी सेन्सेक्सचा निर्देशांक 638 अंकांच्या वाढीसह 52837.21 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 191 अंकांच्या वाढीसह 15824.05 अंकांवर बंद झाला. बकरी ईदच्या निमित्ताने बुधवारी शेअर बाजार बंद होता.
शेअर बाजारात गुरूवारी जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, टाटा स्टील आणि भारती एअरटेल यांचे समभाग तेजीसह बंद झाले. दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, बजाज ऑटो, सिप्ला आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले. विविध क्षेत्रातील निर्देशांकाचा विचार करता आयटी, माध्यम, वित्तसेवा, खासगी बँका, बँका, फार्मा, ऑटो, धातू, एफएमसीजी आणि रियल्टी निर्देशांक तेजीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
शेअर बाजारात गुरुवारी चौफेर खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 समभाग मजबुतीसह बंद झाले. तर निफ्टीतील 50 पैकी 43 समभाग वाढीसह बंद झाल्याचे पहायला मिळाले. मागील दोन दिवसातील नुकसानीची भरपाई निफ्टी निर्देशांकाने गुरुवारी केल्याचे दिसले.
जागतिक बाजारामध्ये गुरुवारी तेजीचा माहोल राहिल्याने त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. आशियाई बाजार गुरुवारी मजबुतीसह बंद होण्यात यशस्वी झाला. चीनचा शांघाई कंपोझिट 0.34 टक्के आणि कोरियाचा कोस्पी 1.07 टक्के मजबुतीसह बंद झाल्याचे पहायला मिळाले. तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांकही 1.84 टक्के वाढीसह बंद झाला. जपानच्या बाजाराला सुट्टी होती.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टेक महिंद्रा… 1148
- जेएसडब्ल्यु स्टील 716
- बजाज फायनान्स 6195
- भारती एअरटेल 546
- बजाज फिनसर्व्ह 13064
- लार्सन आणि टुब्रो 1642
- टाटा स्टील… 1273
- अदानी पोर्ट्स.. 691
- विप्रो…………. 584
- हिंडाल्को…….. 393
- इन्फोसिस…. 1590
- ओएनजीसी…. 115
- आयसीआयसीआय 655
- टायटन…….. 1701
- युपीएल……… 828
- सनफार्मा …… 687
- बीपीसीएल…. 460
- एचडीएफसी. 2409
- रिलायन्स….. 2120
- कोल इंडिया…. 144
- डिव्हीस लॅब्स 4843
- एसबीआय इन्शु. 1026
- इंडसइंड बँक… 992
- आयओसी……. 106
- मारुती सुझूकी 7299
- पॉवरग्रीड कॉर्प 233
- नेस्ले………. 17994
- डॉ. रेड्डिज लॅब्स 5384
- एनटीपीसी….. 119
- ग्रेसिम……… 1582
- अल्ट्राटेक सिमेंट 7459
- एचडीएफसी बँक 1448
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एचयुएल…… 2378
- एशियन पेंट्स 3106
- बजाज ऑटो.. 3853
- सिप्ला……….. 949
- ब्रिटानिया…. 3425
- महिंद्रा आणि महिंद्रा 758
- एचडीएफसी लाईफ….. 662
- हिरोमोटो कॉर्प 2838
- श्री सिमेंट… 28080