मागील 18 महिन्यातील सर्वाधिक मजबूती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील सेवा क्षेत्राने ऑगस्टमध्ये मागील दीड वर्षांमध्ये सर्वात वेगाने विस्तारीत होण्याचे ध्येय गाठले आहे. नवीन कामांना मिळणारी गती आणि मागणीमधील सुधारणा यामुळे सेवा क्षेत्राने तेजी प्राप्त केली असल्याची माहिती एका मासिक सर्वेक्षणामधून देण्यात आली आहे.
काही व्यवसाय लॉकडाऊननंतर पुन्हा सुरु होत आहेत तसेच ग्राहकांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. ही वाढ जुलैमध्ये 45.4 टक्क्यांनी वाढून ऑगस्टमध्ये 56.7 टक्क्यांवर राहिली असल्याचे इंडिया सर्व्हिसेज बिझनेस ऍक्टिव्हिटी इंडेक्स यांनी सांगितले आहे.
सेवा क्षेत्राने मागील चार महिन्यांमध्ये उत्पादनात प्रथमच वृद्धी आणि व्यवसायांमध्ये तेजी प्राप्त केली आहे. परचेजिंग मॅनेजर्स इंडेक्सनुसार भाषांमध्ये 50 च्या वर गुण राहिले असतील तर वृद्धी प्राप्त केली असल्याचे म्हटले जाते. हाच आकडा 50 च्या खाली गेला तर आपुंचन स्थिती दर्शवली जाते.
लसीकरणासह अन्य घटकांचा प्रभाव
काही व्यवसायांची शटर पुन्हा उघडण्यात आली असून लसीकरणानेही वेग पकडला असल्याच्या कारणास्तव ग्राहकांमध्ये विश्वास परतला आहे. याचा सकारात्मक परिणाम सेवा क्षेत्राच्या वृद्धीवर दिसतो आहे, असे आयएचएस मार्केटचे आर्थिक विभागांचे सहाय्यक संचालक पोलियाना ड लीमा यांनी म्हटले आहे.