तरनतारनमध्ये सीमेनजीक दिसले दोन ड्रोन
वृत्तसंस्था/ अमृतसर
पाकिस्तानने पुन्हा एकदा तरनतारनच्या खालडा भागात सीमेपलिकडून ड्रोन पाठविण्याची आगळीक केली आहे. पण ड्रोनचा सुगावा लागताच बीएसएफ जवानांनी गोळीबार केला आहे. प्रत्युत्तरामुळे ड्रोन पुन्हा पाकिस्तानात परतले आहेत. या घटनेनंतर सीमेवर शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत बीएसएफच्या जवानांसह पंजाब पोलीस पथकही सामील झाले.
मध्यरात्रीनंतर बीएसएफची तुकडी गस्त घालत असताना राजोके गावानजीक ड्रोनचा आवाज ऐकू आला. रात्र असल्याने ड्रोनची हालचाल दिसू लागली. पण त्यांनी सतर्कतेदाखल आवाजाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. जवानांच्या गोळीबारानंतर ड्रोन पाकिस्तानात परतले. ड्रोनचा आवाज जवानांसह ग्रामस्थांनीही ऐकला होता.