वृत्तसंस्था./ नवी दिल्ली
बर्मिंगहॅममध्ये होणाऱया आगामी राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत सहभागी होणाऱया भारताच्या पुरूष अ संघाच्या प्रशिक्षकपदी माजीं कर्णधार सरदार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भारत महिला अ संघाच्या पमुख प्रशिक्षकपदी माजी हॉकीपटू दीपक ठाकुरची नियुक्ती करण्यात आली आहे.
या आगामी स्पर्धेसाठी सराव शिबिराकरिता संभाव्य 33 पुरूष हॉकीपटूंची निवड करण्यात आली. या चमूमध्ये रूपिंदर पाल सिंग, वीरेंद्र लाक्रा आणि एस.व्ही. सुनील यांचा समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही हॉकीपटूंनी आपल्या निवृत्तीच्या घोषणेनंतर हॉकी क्षेत्रात पुनरागमन केले आहे. त्याचप्रमाणे भारताच्या अ महिला संघाच्या प्रशिक्षकपदी दीपक ठाकुर यांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही संघांसाठी बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये सोमवार 7 मार्चपासून राष्ट्रीय सराव शिबीर आयोजित केले आहे.