वृत्तसंस्था/ काठमांडू
गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात नेपाळने भारताला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. या सामन्यात अंजन बिस्लाने यजमान नेपाळला 36 व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत नेपाळने भारतावर 1-0 अशी बढत घेतली होती. साठाव्या मिनिटाला बदली खेळाडू अनिरुद्ध थापाने भारताला बरोबरी साधून दिली. या संपूर्ण सामन्यामध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. भारतीय संघाने बचावात्मक खेळावर अधिक भर दिला होता. आता उभय संघातील दुसरा आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचा फुटबॉल सामना रविवारी खेळविला जाणार आहे. पुढील महिन्यात मालदीवमध्ये होणाऱया सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाने सरावासाठी