वर्षाच्या उत्तरार्धातील आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेची रुपरेषा जाहीर
दुबई / वृत्तसंस्था
यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवल्या जाणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताची पहिलीच लढत पारंपरिक, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध दि. 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आयसीसीने शुक्रवारी या स्पर्धेची रुपरेषा जाहीर केली. भारताचा दक्षिण आफ्रिका, बांगलादेशसह दुसऱया गटात समावेश आहे. अन्य 2 पात्रताधारक संघ कोणते असतील, हे पहिल्या फेरीअखेर स्पष्ट होईल.
सुपर-12 फेरीत दि. 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सलामी लढतीनंतर भारताची दुसरी लढत दि. 27 ऑक्टोबर रोजी अ गटातील उपजेत्या संघाविरुद्ध सिडनीत होईल. त्यानंतर दक्षिण आफ्रिका (पर्थमध्ये 30 ऑक्टोबर) व बांगलादेश (ऍडलेड ओव्हलवर 2 नोव्हेंबर) यांच्याविरुद्ध भारताचे सामने रंगणार आहेत. त्यानंतर दि. 6 नोव्हेंबर रोजी एमसीजीवर ब गटातील विजेत्या संघाविरुद्ध शेवटची साखळी लढत होईल.
सुपर-12 ही स्पर्धेतील दुसरी फेरी असेल. या फेरीत 2 गटात 12 संघ विभागले जाणार असून यातील सामने दि. 22 ऑक्टोबरपासून खेळवले जातील. यजमान व विद्यमान विजेते ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात पहिली लढत होईल. न्यूझीलंडचा संघ नंतर दि. 1 नोव्हेंबर रोजी इंग्लंडविरुद्ध गब्बा येथे लढणार आहे. सुपर-12 फेरीसाठी ऑस्ट्रेलियाचा जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित इंग्लंड, न्यूझीलंड, अफगाण तसेच अ गट जेता व ब गट उपजेत्या संघासह पहिल्या गटात समावेश आहे.
स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे दि. 9 व 10 ऑक्टोबर रोजी एससीजी व ऍडलेड ओव्हलवर खेळवले जाणार आहेत. वर्ल्डकपची एखादी सेमीफायनल ऍडलेड ओव्हलवर खेळवण्याची ही पहिलीच वेळ असेल. एमसीजीवर दि. 13 नोव्हेंबर रोजी स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. त्यापूर्वी, पहिल्या फेरीत 2014 चॅम्पियन्स श्रीलंका व नामिबिया यांच्यात 16 ऑक्टोबरला गिलाँगमधील कार्डिनिया पार्कवर सलामीचा सामना होईल. दोन्ही गटातील पहिले दोन अव्वल संघ दुसऱया फेरीसाठी पात्र ठरतील.
2022 आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक
तारीख / सामना / वेळ / ठिकाण
पहिली फेरी
16 ऑक्टोबर / श्रीलंका वि. नामिबिया / सकाळी 9.30 वा. / गिलाँग
16 ऑक्टोबर / क्वॉलिफायर 2 वि. क्वॉलिफायर 3 / दु. 1.30 वा. गिलाँग
17 ऑक्टोबर / विंडीज वि. स्कॉटलंड / सकाळी 9.30 वा. / होबार्ट
17 ऑक्टोबर / क्वॉलिफायर 1 विरुद्ध 4 / दुपारी 1.30 वा. / होबार्ट
18 ऑक्टोबर / नामिबिया वि. क्वॉलिफायर 3 / सकाळी 9.30वा. / गिलाँग
18 ऑक्टोबर / श्रीलंका वि. क्वॉलिफायर 2 / दुपारी 1.30 वा. / गिलाँग
19 ऑक्टोबर / स्कॉटलंड वि. क्वॉलिफायर 4 / सकाळी 9.30 वा. / होबार्ट
19 ऑक्टोबर / विंडीज वि. क्वॉलिफायर 1 / दुपारी 1.30 वा. / होबार्ट
20 ऑक्टोबर / श्रीलंका वि. क्वॉलिफायर 3 / सकाळी 9.30 वा. / गिलाँग
20 ऑक्टोबर / नामिबिया वि. क्वॉलिफायर 2 / दुपारी 1.30 वा. / गिलाँग
21 ऑक्टोबर / विंडीज वि. क्वॉलिफायर 4 / सकाळी 9.30 वा. / होबार्ट
21 ऑक्टोबर / स्कॉटलंड वि. क्वॉलिफायर 1 / दुपारी 3.30 वा. / होबार्ट
सुपर-12 फेरी
22 ऑक्टोबर / न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया / दु. 12.30 वा. / सिडनी
22 ऑक्टोबर / इंग्लंड वि. अफगाणिस्तान / सायं. 4.30 वा. / पर्थ
23 ऑक्टोबर / गट अ विजेता वि. ब विजेता / सकाळी 9.30 वा. / होबार्ट
23 ऑक्टोबर / भारत वि. पाकिस्तान / दु. 1.30 वा. / मेलबर्न
24 ऑक्टोबर / बांगलादेश वि. गट अ उपजेता / सकाळी 9.30 वा. / होबार्ट
24 ऑक्टोबर / द. आफ्रिका वि. गट ब विजेता / दु. 1.30 वा. / होबार्ट
25 ऑक्टोबर / ऑस्ट्रेलिया वि. गट अ विजेता / सायं. 4.30 वा. / पर्थ
26 ऑक्टोबर / इंग्लंड वि. ब गट उपजेता /स. 9.30 वा. / मेलबर्न
26 ऑक्टोबर / न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान / दु. 1.30 वा. / मेलबर्न
27 ऑक्टोबर / द. आफ्रिका वि. बांगलादेश / स. 8.30 वा. / सिडनी
27 ऑक्टोबर / भारत वि. अ गट उपजेता / दु. 12.30 वा. / सिडनी
27 ऑक्टोबर / पाकिस्तान वि. ब गट जेता / सायं. 4.30 वा. / पर्थ
28 ऑक्टोबर / अफगाण वि. ब गट उपजेता / स. 9.30 वा. / मेलबर्न
28 ऑक्टोबर / इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया / दु. 1.30 वा. / मेलबर्न
29 ऑक्टोबर / न्यूझीलंड वि. अ गट जेता / दु, 1.30 वा. /सिडनी
30 ऑक्टोबर / बांगलादेश वि. ब गट जेता / स. 8.30 वा. / ब्रिस्बेन
30 ऑक्टोबर / पाकिस्तान वि. अ गट उपजेता / दु. 12.30 वा. / पर्थ
30 ऑक्टोबर / भारत वि. द. आफ्रिका / सायं. 4.30 वा. / पर्थ
31 ऑक्टोबर / ऑस्ट्रेलिया वि. ब गट उपजेता / दु. 1.30 वा. / ब्रिस्बेन
1 नोव्हेंबर / अफगाण वि. अ गट विजेता / स. 9.30 वा. / ब्रिस्बेन
1 नोव्हेंबर / इंग्लंड वि. न्यूझीलंड / दुपारी 1.30 वा. / ब्रिस्बेन
2 नोव्हेंबर / ब गट जेता वि. अ गट उपजेता / स. 9.30 वा. / ऍडलेड
2 नोव्हेंबर / भारत वि. बांगलादेश / दुपारी 1.30 वा. / ऍडलेड
3 नोव्हेंबर / पाकिस्तान वि. द. आफ्रिका / दु. 1.30 वा. / सिडनी
4 नोव्हेंबर / न्यूझीलंड वि. ब गट उपजेता / स. 9.30 वा. / ऍडलेड
4 नोव्हेंबर / ऑस्ट्रेलिया वि. अफगाण / दु. 1.30 वा. / ऍडलेड
5 नोव्हेंबर / इंग्लंड वि. अ गट विजेता / दु. 1.30 वा. / सिडनी
6 नोव्हेंबर / द. आफ्रिका वि. अ गट विजेता / पहाटे 5.30 वा. / ऍडलेड
6 नोव्हेंबर / पाकिस्तान वि. बांगलादेश / स. 9.30 वा. / ऍडलेड
6 नोव्हेंबर / भारत वि. ब गट जेता / दु. 1.30 वा. / मेलबर्न
बाद फेरी
9 नोव्हेंबर / पहिली उपांत्य लढत / दुपारी 1.30 वा. / सिडनी
10 नोव्हेंबर / दुसरी उपांत्य लढत / दुपारी 1.30 वा. / ऍडलेड
13 नोव्हेंबर / फायनल / दुपारी 1.30 वा. / मेलबर्न
पहिली फेरी
अ गट ः श्रीलंका, नामिबिया, दोन पात्रताधारक संघ
ब गट ः विंडीज, श्रीलंका, दोन पात्रताधारक संघ
सुपर-12 फेरी
पहिला गट ः इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाण, अ गट जेता, ब गट उपजेता
दुसरा गट ः भारत, पाकिस्तान, द. आफ्रिका, बांगलादेश, ब गट जेता, अ गट उपजेता.