वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सैन्यासाठी लागणाऱया वाहनांच्या निर्मितीकरिता भारत फोर्ज कंपनीने नुकताच पॅरामाउंट ग्रुप यांच्याशी करार केला आहे. पॅरामाउंट ग्रुप जागतिक एरोस्पेस आणि टेक्नॉलॉजी फर्म आहे. देशातील सैन्याकरता लागणारी वाहने बनवण्याकरता दोन्ही कंपन्या एकत्र येणार आहेत.
अबूधाबीमध्ये आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन दरम्यान दोन्ही कंपन्यांमध्ये वाहन निर्मितीच्या करारावर सह्या करण्यात आल्या. तंत्रज्ञानाच्या वापरासह वाहनांची निर्मिती बहुखुबीने करण्याचा प्रयत्न दोन्ही कंपन्यांकडून येणाऱया काळात होणार आहे. याच अनुषंगाने सैन्याकरता खाण व इतर अवघड अशा जागेमध्ये पोहोचणारे सर्व सोयींनी युक्त असे कल्याणी एम 4 वाहन बनवले जाणार आहे. हे वाहन जगातील इतर देशांनाही उपयुक्त ठरेल असा विश्वास भारत फोर्जचे उपव्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांनी सांगितले.