फोन पे, गुगल पेला देणार टक्करः 225 कोटी रुपये जमवले
वृत्तसंस्था/ मुंबई
देवाणघेवाणीच्या व्यवहारासाठी महत्त्वाच्या ठरणाऱया ऍमेझॉन पेसाठी 225 कोटी रुपये जमवण्यात आले असल्याची माहिती ईकॉमर्स क्षेत्रातील कंपनी ऍमेझॉनकडून देण्यात आली आहे. या अनुषंगाने ऍमेझॉन पे आता फोन पे, गुगल पे आणि पेटीएम यासारख्या स्पर्धकांना चांगलीच टक्कर देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
इक्वीटी समभागांच्या माध्यमातून वरील रक्कम जमा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरची रक्कम ऍमेझॉन पेच्या विकासासाठी वापरली जाणार आहे. गेल्या वषी ऑक्टोबरमध्ये ऍमेझॉन पेमध्ये 700 कोटी रुपयांची भर घालण्यात आली होती. भारतीय बाजारात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ऍमेझॉन पेने आपली रणनीती आखली आहे. ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी गेल्या वषी जानेवारीमध्ये भारतात 7 हजार कोटींची वाढीव गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत येणाऱया कालावधीत लघु व मध्यम व्यावसायिकांना ऑनलाइन क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.