वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि लंका यांच्यात जुलै महिन्यात वनडे आणि टी-20 मालिका खेळविल्या जाणार असल्याची माहिती सोमवारी प्रक्षेपण करणाऱया सोनी नेटवर्कतर्फे देण्यात आली. या दोन्ही मालिका लंकेत खेळविल्या जाणार आहेत. वनडे मालिकेला 13 जुलै तर टी-20 मालिकेला 21 जुलैपासून प्रारंभ होईल.
आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील होणाऱया अंतिम लढतीसाठी तसेच इंग्लंडविरूद्ध खेळविल्या जाणाऱया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भाग घेणाऱया भारतीय संघातील एकाही खेळाडूचा लंकेच्या दौऱयासाठी समावेश नाही. लंकेच्या दौऱयावर जाणाऱया भारतीय संघाला माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 2014 च्या इंग्लंड दौऱयावर गेलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी द्रविड यांची फलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. लंकेच्या दौऱयासाठी भारतीय संघाबरोबर राहुल द्रविड प्रमुख प्रशिक्षक म्हणून जाणार आहेत.
दरम्यान, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्राr, भरत अरूण आणि विक्रम राठोड हे इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेवेळी भारतीय संघाबरोबर राहतील. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत 19 वर्षांखालील वयोगटाच्या भारतीय संघातील खेळाडूंना त्याचप्रमाणे भारत अ संघाला राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन लाभत असल्याने भारतीय क्रिकेट क्षेत्रामध्ये नवोदित क्रिकेटपटूंचा दर्जा सुधारल्याचे जाणवते. 2015 साली राहुल द्रविडकडे 19 वर्षांखालील संघाची तसेच भारत अ संघाची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती.