गोल्ड टेडिंग व्यवसायाद्वारे घातला गंडा
वार्ताहर/ भुईंज
सोने खरेदी करुन जादा परतावा मिळवून देणाऱया गोल्ड ट्रेडिंग व्यवसायाद्वारे भुईंज येथील पाच जणांची सुमारे 75 लाखांची फसवणूक झाली आहे. यातील राहुल बजरंग मोरे (रा. भुईंज) याच्या मुसक्या आवळण्यात भुईंज पोलिसांना अटक करण्यात आली आहे. तर राहुल मोरेच्या नातेवाईक असलेल्या पल्ल्वी आत्माराम घाडगे (रा. जाणवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) हिच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी गोल्ड टेडिंग व्यवसायाचे रॅकेट असण्याची शक्यता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी की, अमर सदाशिव कडव (रा. वारागडेवाडी भुईंज) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल बजरंग मोरे (रा. भुईंज) व पल्लवी आत्माराम घाडगे (रा. जाणवली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग) यांनी आपआपसात संगनमत सोने खरेदी करुन जादा परतावा मिळवून देण्याच्या अमिषाने फसवणूक केली आहे. यामध्ये फिर्यादी अमर कडव याच्यासह कुमार प्रकाश तांबोळी, नंदकुमार किरण तांबोळी, विनोद बाबासाहेब पावशे, वैभव भगवानराव शिंदे, रमेश वामन चिकणे सर्वजण (रा. भुईंज) यांना गोल्ड टेडिंग व्यवसायाची माहिती देवून सोने खरेदीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगून त्यांचा आत्मविश्वास संपादन केला. त्यांना ऍक्सिस बॅंकेचे खातेवर आरटीजीएस व एनईएफटीद्वारे व्हॉटस्ऍपद्वारे मेसेज पाठवून नोटरी करून विश्वासघात केला. यामध्ये एकूण रक्कम रूपये 74 लाख 39 हजार 34 रूपयांची राहुल बजरंग मोरे (रा. भुईंज) व पल्लवी आत्माराम घाडगे (रा. जाणवली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग) यांनी फसवणुक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरुन भुईंज पोलिसांनी यातील राहुल बजरंग मोरे यास ताब्यात घेवून अटक केली आहे आणि दुसऱया महिला आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे, अशी माहिती यावेळी सपोनि आशिष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, गुंतवणूकदार गेले सहा महिने संबंधितांच्याकडे गुंतवणूक केलेल्या सोन्याच्या पैशाची मागणी करत होते. परंतु त्यांना ते टाळाटाळ करून मिळत नसल्याने त्यांनी शेवटी भुईंज पोलिसांत तक्रार दाखल केली व आज दोन संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील एक आरोपी अटक केला आहे.