कोयनानगर
मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.47 वाजता बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने कोयनेसह संपूर्ण पाटण तालुका हादरला.
सकाळी 9.47 च्या सुमारास कोयनानगर परिसरात भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का जाणवला. या धक्क्याने कोयनेसह संपूर्ण पाटण तालुका हादरला. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाची खोली 5 किलोमीटर, तर केंद्रबिंदू कोयनेपासून 9.6 किलोमीटर अंतरावर काडोली गावाच्या पश्चिमेस 7 किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपामुळे परिसरात कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही. तसेच कोयना धरणास कोणताही धोका नसल्याचे कोयना धरण व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे.