वृत्त संस्था/ लंडन
एफए चषक महिलांच्या सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटीने मँचेस्टर युनायटेडचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे.
या सामन्यात पूर्वार्धात लुसी ब्राँझने मँचेस्टर सिटीचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत मँचेस्टर सिटीने 1-0 अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धात मँचेस्टर सिटीतर्फे आणखी दोन गोल नोंदविले गेले. 71 व्या मिनिटाला लॉरेन हँपने तर 84 व्या मिनिटाला कॅरोलिनी वेअरने गोल केले. या विजयामुळे मँचेस्टर सिटी संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 33 गुणांसह दुसरे स्थान मिळविले असून चेल्सी 35 गुणांसह तिसऱया स्थानावर तर मँचेस्टर युनायटेड 32 गुणांसह तिसऱया स्थानावर आहेत.