हाणामारीचे विडीओ प्रचंड वायरल-पालकांना त्रास
गौरी आवळे/ सातारा
महाविद्यालय परिसरात भांडणे झाली की, नेहमी विद्यार्थ्यांची नावे पुढे येतात. दोन गटात हाणामारी झाली तर नुसते फोटो व्हायरल होतात आणि वातावरण पुन्हा शांत होते. मात्र सातारा शहरातील प्रसिद्ध महाविद्यालयातील विद्यार्थींनीच्यात सुरू झालेला शब्दीक वाद जेव्हा हाणामारीवर आला तेव्हा विद्यार्थींनीची एकच फाईट अन् वातावरण टाईट असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले महाविद्यालय पुन्हा सुरू झाली आहेत. याचा आनंद सर्वांत जास्त विद्यार्थ्यांना झाला. ऑनलाईन शिक्षणापेक्षा पुन्हा आपल्या वर्ग मित्र-मैत्रिणीसोबत शिकायला मिळणार यांचे समाधान त्यांच्या चेहऱयावर दिसत होते. महाविद्यालय परिसरात असणारे निर्भया पथकही सक्रीय झाले. पेट्रोलिंग सुरू होवून टवाळखोरांवर पोलिसा प्रशासनाकडून वॉच ठेवण्यात ठेवण्यात येत होते. त्यामुळे महाविद्यालय परिसरात कोणताही गैरप्रकार घडणार नाही असे वाटत होते. मात्र तीन-चार दिवसांपूर्वी शहरातील प्रसिद्ध महाविद्यालयातील युवतीच्या गटात शब्दीक वाद सुरू झाला. हा शब्दीक वाद काही युवतींनी शांत करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी मध्यस्थी ही करण्यात आली मात्र काही केल्या हा वाद थांबला नाही. तोच हातवारे सुरू झाले आणि भांडणातील विद्यार्थीनीने दुसऱया विद्यार्थींनीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने विद्यार्थीनीने भांडणास सुरूवात केली. तोच दोघींच्यात हाणमारी झाली. ही माहिती याच भांडणातील युवतीने दिली आहे. ही घटना सुरू होताच वाऱयासारखी बातमी सातारा शहरात पसरायला सुरूवात झाली. महाविद्यालय परिसरात भांडणे झाली. या भांडणाचा विडीओ काहींनी बनवला आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून वायरल केला. काही तासांतच संपूर्ण जिह्यात या हाणामारीची चर्चा रंगत गेली. ही हाणामारी थांबवण्यासाठी निर्भया पथकांच्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थींनीना ताब्यात घेतले. यामुळे भांडणे थांबली पण पालकांची धावधाव सूरू झाली. नक्की काय प्रकार घडलाय हे कोणालाच कळेना फक्त विद्यार्थींनी राडा घातलाय ऐवढेच सातारकराच्या कानी आणि तोंडातून ऐकायला मिळत होते