वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लिश प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबचा मध्यमफळीत खेळणारा फुटबॉलपटू इल्के गुंडोगनची सलग दुसऱया महिन्यात सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी निवड झाली आहे.
मँचेस्टर सिटीच्या गुंडोगनने यापूर्वी जानेवारी महिन्यात तर पुन्हा फेब्रुवारी महिन्यात सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकाविला. असा पुरस्कार मिळविणारा मँचेस्टर सिटीचा तो पहिला फुटबॉलपटू आहे. प्रिमियर लिग फुटबॉल स्पर्धेतील गेल्या सहा लिग सामन्यामध्ये खेळताना गुंडोगनने 4 गोल नोंदविले. या स्पर्धेत मँचेस्टर सिटी गुणतक्त्यात 29 सामन्यातून 68 गुणासह आघाडीवर आहे.