बॉक्ंिसग डे क्लासिक लढतीत लिसेस्टर सिटीला 6-3 फरकाने नमवले
लंडन / वृत्तसंस्था
इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेतील बॉक्ंिसग डे क्लासिक लढतीत मँचेस्टर सिटीने लिसेस्टर सिटीचा 6-3 असा धुव्वा उडवत सलग नववा विजय संपादन केला. मँचेस्टर सिटीतर्फे केव्हिन डे ब्रुएन, रियाद महरेझ, इल्केय व रहीम स्टर्लिंग यांनी पहिल्या सत्रात प्रत्येकी 1 गोल करत 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात जेम्स मॅडिसन, लूकमन व इहेनाचो यांनी अवघ्या 11 मिनिटातच 3 गोल करत लिसेस्टर सिटीला कमबॅकची आशा दाखवली. मात्र, 69 व्या मिनिटाला लॅपोर्टेने महरेझच्या कॉर्नरवर मँचेस्टरसाठी पाचवा गोल नोंदवला आणि स्टर्लिंगने संघाचा सहावा गोल नोंदवल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांची उरलीसुरली आशाअपेक्षाही संपुष्टात आली.
अन्य लढतीत अर्सेनल सिटीने नॉर्विचचा 5-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला. कॅरो, बुकायो साका यांनी गोल केल्यानंतर अर्सेनलचे या लढतीवर उत्तम वर्चस्व प्रस्थापित झाले. तिएर्नी, लॅकझेटे व इमिले स्मिथ रोव्हे यांनीही गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. अर्सेनलचा संघ सध्या 35 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. व्हिल्ला पार्कवरील लढतीत रोमेलू लुकाकूने चेल्सीला ऍस्टॉन व्हिल्लाविरुद्ध 3-1 असा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या लढतीत जॉर्गिन्होने दुहेरी गोल केले.