वृत्तसंस्था/ लंडन
प्रीमियर लिग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया अव्वल मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब संघातील प्रमुख स्ट्रायकर गॅब्रियल जेसस आणि बचावफळीतील केली वॉकर हे कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे क्लबच्या व्यवस्थापकांनी सांगितले.
शुक्रवारी गॅब्रियल जिजस आणि वॉकर त्याचप्रमाणे या क्लबच्या इतर काही सदस्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. मँचेस्टर सिटी क्लबच्या प्रशिक्षक वर्गातील दोन सदस्य या चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आता मँचेस्टर सिटीच्या या चारही कोरोनाबाधित व्यक्तिंना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेच्या गुणतत्क्यात मँचेस्टर सिटी आठव्या स्थानावर आहे. त्यांचा या स्पर्धेतील सामना न्यू कॅसल युनायटेड संघाबरोबर शनिवारी होत आहे. त्यानंतर त्यांचा पुढील सामना एव्हर्टन बरोबर येत्या सोमवारी खेळविला जाईल.