जिल्हय़ात 75 नवे रुग्ण, एकाचा मृत्यू
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी काही वेळा रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. कोरोनामुक्त होणाऱयांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. तरी देखील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. मंगळवारी जिल्हय़ातील 148 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 75 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली आहे ही बाब दिलासादायक असली तरी अजूनही कोरोनाची भीती आहे. महत्त्वाचे म्हणजे तिसऱया लाटेबाबत दक्षता घेण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. आतापर्यंत 77 हजार 650 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून 75 हजार 989 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 812 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ामध्ये सध्या 812 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मंगळवारी बेळगाव तालुक्मयामध्ये 28 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 5 जणांचा तर शहरी भागातील 23 जणांचा समावेश आहे. कंग्राळी खुर्द, येळ्ळूर, पिरनवाडी, उचगाव, खासबाग, कंग्राळ गल्ली, आनंदनगर-वडगाव, भाग्यनगर, देवराज अर्स कॉलनी, मीरापूर गल्ली-शहापूर, ओमनगर-खासबाग, रामनगर, सह्याद्रीनगर, शिवबसवनगर, टिळकवाडी या परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.