प्रतिनिधी / कराड :
गुंठेवारीच्या नोंदी प्रमाणित करण्यासाठी वीस हजारांची लाच मागताना मंडलाधिकारी नागेश निकम (वय 37) यांना मंगळवारी सापळा रचून अटक करण्यात आली. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
एका तक्रारदाराने खरेदी केलेल्या गुंठेवारी प्लॉटची तलाठी यांनी धरलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी मंडलाधिकारी निकम यांनी 27 हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदारकडे केली. तडजोडीअंती 20 हजार देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला यासंदर्भात माहिती दिली. मंगळवारी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.