फ्रान्सकडून भांडाफोड
इस्लामाबाद : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्समध्ये ‘इस्लामिस्ट फुटिरवादा’ला संकट ठरवून त्याच्या विरोधात कायदा आणण्याची तयारी चालविली आहे. मॅक्रॉन यांनी पेंच कौन्सिल ऑफ द मुस्लीम फेथला ‘चार्टर ऑफ रिपब्लिकन व्हॅल्यूज’ 15 दिवसांमध्ये स्वीकार करण्यास सांगितले आहे. परंतु यासंबंधी पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारच्या मंत्र्याने बनावट वृत्त प्रसारित करत आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.
होम-स्कुलिंगवर बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक मुलाला ओळखक्रमांक दिला जाणार असून त्याद्वारे तो किंवा ती शाळेत जात आहे की नाही हे पाहिले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱया पालकांना 6 महिन्यांपर्यंतचा कारावास किंवा दंड भरावा लागणार आहे. तर पाकिस्तानच्या मंत्री शिरीन मजारी यांनी केवळ मुस्लीम कुटुंबांवर हा नियम लागू असल्याचे खोटे वृत्त प्रसारित केले होते.