प्रतिनिधी/ बेळगाव
मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या नूतन अध्यक्षा म्हणून शोभा लोकूर यांची निवड झाली आहे. सोसायटीतर्फे 31 जुलै रोजी संचालक मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर व्हर्च्युअल मिटिंग घेऊन नूतन कार्यकारिणी जाहीर केली. तिचा कालावधी 2020 ते 2023 पर्यंत आहे. इतर कार्यकारिणी पुढील प्रमाणे….
उपाध्यक्षा सुरेखा भावे, सावित्री कळ्ळीमनी, सचिव नीना जठार, प्रिया कवठेकर, कोषाध्यक्ष मनीषा नाडगौडा, श्रुती परांजपे, मावळत्या कार्यकारिणीच्या यशस्वी कारकीर्दबद्दल संचालक आशा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले व नूतन कार्यकारीणीला शुभेच्छा दिल्या.