प्रतिनिधी/ बेळगाव
मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे नदी, नाले पुन्हा प्रवाहित झाले आहेत. सध्या पावसाला जोर नसला तरी रिपरिप मात्र कायम आहे. या पावसामुळे कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे.
शहराला लागूनच असलेल्या कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले असून या नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. नदी परिसरातील शिवारामध्ये पाणी शिरून काही ठिकाणी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मार्कंडेय नदी गेल्या काही वर्षांमध्ये अरुंद तसेच गाळामुळे खोली कमी होत चालली आहे. या नदीमधील पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. नदीला अनेक गावांतील तसेच शहराचेही पाणी मिसळत आहे. त्यामुळे दरवषी नदी पात्राबाहेर पडताच नदीकाठ परिसरातील पिकांना फटका बसत असतो.
राकसकोपपासून आलेल्या या नदीला विविध नाल्यांचे पाणी मिळते. त्यामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर येत असते. यावषी पहिल्यांदाच नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून आणखी पाऊस झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील डेनेजचे पाणी तसेच कचराही मोठय़ा प्रमाणात जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी हा कचरा अडकतो. त्यामुळे पाणी नदीकाठ परिसरात पसरत आहे. तेव्हा उन्हाळय़ातच नदीची खोदाई होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. मार्कंडेय नदीतील गाळ बऱयाच वर्षांपासून काढण्यात आला नाही. या नदीमध्ये झाडेझुडुपे तसेच जलपर्णी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.
परिणामी नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन शिवारामध्ये पसरत आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला फटका बसू लागला आहे. यावषी दुसऱयांदा कंग्राळी येथील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. आणखी पाऊस पडल्यास परिसरातील शेतीला फटका बसण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.