उचगाव येथील रेणुकादेवी मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी मठाधीश शिवानंद स्वामी यांचे मनोगत
वार्ताहर / उचगाव
देवदेवतांची मंदिरे ही सर्वांना ऊर्जा देणारी शक्तीपीठे असून रेणुकादेवीचा महिमा अपार आहे. कर्नाटक-महाराष्ट्रामध्ये मोठय़ा प्रमाणात रेणुकादेवीचे भक्तगण विखुरलेले आहेत. भजन, चिंतन करत विश्वास, श्रद्धा ठेवल्यास आपले जीवन निश्चितच सुखकर बनते, असे मनोगत अलौकिक ध्यान मंदिराचे मठाधीश शिवानंद स्वामी यांनी व्यक्त केले.
उचगाव गणपत गल्लीतील पुरातन रेणुकादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. ग्रामस्थांच्या जवळपास 25 लाखांच्या देणगीतून भव्य आणि रेखीव आकर्षक अशा मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याने या मंदिराचा उद्घाटन समारंभ सलग चार दिवस चालू होता. या समारंभात शिवानंद स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष संभाजी कदम होते.
यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष युवराज कदम, ता. पं. सदस्या मथुरा तेरसे, ग्रा. पं. माजी अध्यक्षा योगिता देसाई, पी. के. तरळे उपस्थित होते.
स्वागत उपाध्यक्ष रामा कदम, बाळू पावशे, बाळू देसाई, शंकर पाटील यांनी केले. यावेळी रेणुकादेवीच्या मूर्तीची प्रति÷ापना, अभिषेक, आरती, पूजा तसेच विविध पूजांचा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या हस्ते पार पडला. पौरोहित्य चैतन्य कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱयांनी केले.
सत्कार समारंभ
मंदिराच्या उभारणीसाठी कार्य केलेल्या गवंडी, सेंट्रिंग मेस्त्राr, पेंटर, फॅब्रिकेटर्स, इलेक्ट्रिशियन्स, फर्निचर-कळस मेस्त्राr, काच फिटिंग, हार्डवेअर अशा सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मंदिराचे आर्किटेक्चर आर. एम. चौगुले, मूर्तिकार गुंडू लोहार व रेणुकादेवीच्या मूर्तीला श्रृंगार केलेल्या लक्ष्मी दत्ताजी कानूरकर यांचाही सत्कार केला.
एक वर्षाच्या कालावधीत मंदिराचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल उचगाव वारकरी संप्रदाय, ज्ञानेश्वर भजनी मंडळ, ज्ञानेश्वर दूध संघ, शिवज्योत युवक मंडळातर्फे संभाजी कदम, एन. ओ. चौगुले, लुमाण्णा ऊर्फ बाळू पावशे, शंकर पाटील, दत्ता चौगुले, कल्लाप्पा पाटील, गोपाळ पावशे, एल. डी. चौगुले यांचा शाल, भगवे फेटे, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
गावातील तसेच उचगाव पंचक्रोशीतील महिलांकडून रेणुकादेवीच्या पडल्या व ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी या भागातील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी केले. पुंडलिक पावशे, अशोक चौगुले यांनी आभार मानले.