कंग्राळी बुद्रुक : येथील मरगाई नगरमधील स्वराज्य युवक मंडळाच्या बालचमूंनी साकारलेल्या पन्हाळागडाच्या प्रतिकृतीचे उद्घाटन तसेच संगीत खुर्ची, रांगोळी, लिंबू-चमचा, धावणे, दोरीवरून उडय़ा आदी विविध स्पर्धांचे उद्घाटन व बक्षीस वितरण असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा. पं. माजी सदस्य जयराम पाटील, शिक्षक पुंडलिक पाटील, मराठी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष मोहन भैरटकर, सदस्य विष्णू पाटील, गवंडी मेस्त्री प्रकाश कट्टीमनी, बसवंत मारुती पाटील, परशराम हुरुडे, शंकर पाटील, यल्लाप्पा साळुंखे, सूरज पाटील उपस्थित होते. दीपप्रज्वलन व फोटोपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पन्हाळागड किल्ला प्रतिकृती व विविध स्पर्धांचेही उपस्थितांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
बालचमूंचाही गौरव
अमोल साळुंखे, जय भैरटकर, ऋषिकेश पाटील व इतर बालचमूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजळा देत किल्ले पन्हाळा गडाची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे. यावेळी बालचमूंचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.