प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहर परिसरातील एका मच्छीमार संघटनेच्या विद्यमान अध्यक्षांवर प्राप्तीकर अधिकाऱयांनी धाड टाकल्याचे बोलले जात आहे. ख्यातनाम असा हा मच्छीमार नेता असल्याने त्यांच्या मदतीसाठी एक मत्स्य खात्याचा अधिकारी सरसावला. आपल्या ओळखीच्या प्राप्तीकर अधिकाऱयांमार्फत या मच्छीमार नेत्याला वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
मच्छीमार संघटनेच्या माध्यमातून गब्बर झालेल्या या पुढाऱयावर शनिवारी प्राप्तीकर अधिकाऱयांची धाड पडली. यावेळी चांगलेच घबाड या अधिकाऱयांच्या ताब्यात आले. मात्र राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या मच्छीमार नेत्याच्या मदतीला अनेकजण धावून आले. अधिकाऱयांपासून राजकीय नेत्यांची धावपळ सुरू झाली. त्यानंतर याविषयी तपशीलवार चर्चा रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात सुरू आहे.
.