कॅसरलॉकनजीक दुर्घटना : तरीही मोठा अनर्थ टळला : रेल्वे व्यवस्थापनाने वेळेत केले मदतकार्य : सर्व 142 प्रवासी सुखरुप
प्रतिनिधी / वास्को, रामनगर
कॅसरलॉकजवळ रेल्वेमार्गावर दरड कोसळण्याची घटना बुधवारी सकाळी घडली. दरड कोसळल्याने या मार्गावरील एकमेव प्रवासी रेलसेवा असलेल्या दिल्ली – निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस दुपारपर्यंत अडकून पडली. त्यामुळे अडचणीच्या काळातही प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सर्व 142 प्रवासी सुखरुप घरी पोहोचले.
हजरत निजामुद्दीन ते वास्को या मार्गावर धावणारी (रेल्वे क्र. 02780) रेल्वे जोयडा तालुक्मयातील कॅसलरॉकनजीक करंजे गावाजवळ पोहोचताच रेल्वे इंजिनवर अंदाजे 700 चौ. घन मीटर जाडीची दरड कोसळली. या परिसरात मागील दोन दिवसांपासून तुफान पाऊस होत असल्यामुळे ही दरड कोसळली. या ठिकाणी रस्त्याची सोय नसल्यामुळे माती काढण्यासाठी मशीन घेऊन जाणे शक्मय नव्हते. त्यामुळे 80 कामगारांनी सलग 8 तास काम करत रेल्वे रूळावरील माती हटविली.
दुपारी दोनपर्यंत माती काढण्याचे काम पूर्ण
कॅसलरॉकपासून 8 कि. मी. अंतरावर असणाऱया करंजोळनजीक ही घटना घडली. त्यामुळे रेल्वे पुन्हा कॅसलरॉक रेल्वेस्टेशनवर आणण्यात आली. यामध्ये असणाऱया प्रवाशांना सकाळचा नाष्टा व दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यांना बेळगावमधून बस मागवून वास्कोपर्यंत सोडण्यात आले. दुपारी दोनपर्यंत माती काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर रेल्वेचे सिनियर डिव्हिजनल इंजिनिअर निरज बाफना यांनी रेल्वेमार्गाची पाहणी केली.
80 कामगारांनी रेल्वेमार्ग केला खुला
कॅसलरॉकनजीक घाटामध्ये पाऊस पडत असल्यामुळे दरड कोसळली. रेल्वे इंजिनसमोर दरड कोसळल्यानंतर रेल्वे कॅसलरॉक येथे माघारी आणण्यात आली. दरड कोसळली त्या ठिकाणी मशीन घेऊन जाणे शक्मय नसल्यामुळे 80 कामगारांनी माती बाजूला केली, अस ई. विजया (जनसंपर्क अधिकारी नैर्त्रुत्य रेल्वे) यांनी दिली.
रेल्वेचे इंजिनच दगडांमध्ये अडकल्याने गंभीर समस्या निर्माण झाली. त्यामुळे लोंढय़ाहून दुसरे इंजिन आणून ही रेल्वे पुन्हा लोंढा स्टेशनकडे वळवण्यात आली. या रेल्वेमध्ये गोव्याकडे येणारे 142 प्रवासी होते. या रेलमार्गावर सध्या केवळ ही एकच प्रवासी रेल्वे धावत आहे. वास्को द गामा स्थानकापर्यंत येणारी ही रेल्वे मागच्या दोन महिन्यांपासून वास्कोत वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे मडगावातच शेवटचा थांबा घेते व तेथूनच पुन्हा दिल्लीकडे प्रयाण करते.
लोंढय़ांत सकाळी उशिरापर्यंत हे प्रवासी पुढच्या प्रवासासाठी ताटकळत होते. त्यामुळे रेल्वे विभागानेच या प्रवाशांना बसमधून गोव्यात पोहोचण्याची व्यवस्था केल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली. जवळपास सहा तासांनी रेल्वेच्या पथकाने ती रेलमार्गावरील दरडी हटवून रेलमार्ग सुरळीत केला. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास ही रेल्वे मडगावकडे रवाना झाली.
पुन्हा रात्री दूधसागरनजीक दरड कोसळली
करंजोळ येथे दरड कोसळल्याने गोवा एक्स्प्रेस पुन्हा कॅसलरॉक रेल्वे स्थानकावर परत पाठविण्यात आली होती. कोसळलेली दरड दुपारी 3.30 च्या दरम्यान हटवून गोवा एक्स्प्रेस पुन्हा मार्गस्थ झाली. त्यानंतर दूधसागरवरून सायंकाळी 5 वाजता निघणारी गोवा एक्स्प्रेस कॅसलरॉक रेल्वे स्थानकावर निघाली. मात्र, रात्री पुन्हा 8 च्या दरम्यान दूधसागरनजीक दरड कोसळल्याने पुन्हा रेल्वेचे कर्मचारी दरड हटविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. दरड हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.