प्रतिनिधी /मडगाव
दागिन्यांच्या हॉलमार्कला नव्हे तर डीएचआयला विरोध करण्यासाठी मडगावातील ज्वेलरी दुकाने सोमवारी बंद ठेवण्यात आली होती.ऑल गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनतर्फे हा बंद पुकारण्यात आला होता.
हॉलमार्कीग केंद्रात यदाकदाचित चूक झाली तर त्याचे खापर ज्वेलरी विक्री करण्याऱयांवर फोडण्यात येणार आहे आणि याचाच विरोध करण्यासाठी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणीक बंद पुकारण्यात आला.
असोसिएशनचे अध्यक्ष प्रमित रायकर यांनी या बंदचे समर्थन केले. पूर्वी एक दोन दिवसात दागिन्यांसंबंधी हॉलमार्क करुन मिळायचे आता वरील अटीमुळे (डीएचआय) 10 -15 दिवस लागण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम थेट ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. हॉलमार्क सेंटरने कदाकदाचित केलेल्या चुकांसंबंधी ज्वेलर्सना जबाबदार धरता कामा नये. बीएसआयने सुमारे 80 हॉलमार्कीग सेंटरचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. उत्तर गोव्यासाठी एक हॉलमार्कीग सेंटर असले तरी ते सध्या कार्यरत नसल्यामुळे संपूर्ण गोव्यासाठी दक्षिणेत असलेले एकच हॉलमार्कीग सेंटर सध्या चालू असल्याचे श्री. रायकर यांनी सांगितले.