प्रतिनिधी /म्हापसा
कळंगूट भागात भरमसाठ बिले येत असल्याच्या निषेधार्थ कळंगूटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस व माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी व येथील नागरिकांनी वीज खात्याच्या अभियंत्याची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करून सध्या आलेली बिले त्वरित रद्द करण्याची मागणी केली.
यावेळी आग्नेल फर्नांडिस यांनी कळंगुटमध्ये भरमसाठ येणाऱया बिलाना सरकार जबाबदार असल्याचे सांगून नागरिकांनी याची चौकशी करावी. भाजप सरकारने सामान्य जनतेचे कंबरडे मोडल्याचा आरोप केला. जोसेफ सिक्वेरा यांनी थेट मंत्री मायकल लोबो यांच्यावर आरोप करीत मंत्र्याचे याकडे लक्ष नसल्याचे म्हटले. ऐरवी छोटय़ा छोटय़ा गोष्टीवर आवाज उठविणारे मंत्री लोबो ग्राहकांच्या तसेच सर्वसामान्य जनतेला येणाऱया भरमसाठ बिलाबाबत कता बोलत नाही असा आरोप केला. कळंगूट काँग्रेस गटाध्यक्ष राजेंद्र कोरगावकर यांनीही याकामी सरकारलाच जबाबदार धरून सरकारने हा प्रश्न योग्यरीत्या व त्वरित सोडवावा अशी मागणी केली आहे.