प्रतिनिधी/ पणजी
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असून बुधवारी राज्यात 621 कोरोनाबाधितांची भर पडली. कोरोनाची बाधा झाल्याने सहा जणांना आपले प्राणही गमवावे लागले. कोरोनामुळे राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या आता 262 झाली आहे. सध्या 4833 रुग्ण सक्रिय कोरोनाबाधित असून बुधवारी 281 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सांखळी, डिचोली, मडगावात रुग्णसंख्या वाढत असून मडगावात सर्वाधिक तब्बल 432 कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण आहेत.
मागील दोन दिवस कोरोनाबाधितांची संख्या कमी होत होती. त्यामुळे काही प्रमाणात दिलासादायक स्थिती होती, मात्र बुधवारी बाधितांच्या संख्येत वाढ झाली. राज्यातील सर्वच भागातून कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागले आहेत.
डिचोली, सांखळी, पेडणेतही वाढती रुग्णसंख्या
डिचोली तालुक्यात सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा आता 152 एवढा झाला आहे. सांखळीतील कोरोनाबाधितांची संख्या 298 झाली आहे. पेडणे तालुक्यात सद्यस्थितीत 202 रुग्ण असून वाळपईची संख्या 171 वर पोहोचली आहे. म्हापशाची रुग्णसंख्या 197 वर आली असून पणजीत 243 कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आहे.
हळदोणाची रुग्णसंख्या 122 झाली आहे. बेतकीची रुग्णसंख्या 151, कांदोळीची रुग्णसंख्या 51, कासारवर्णेची रुग्णसंख्या 85 तर कोलवाळची रुग्णसंख्या 119 झाली आहे. खोर्लीची रुग्णसंख्या 117 तर चिंबलची रुग्णसंख्या 150 झाली आहे. शिवोलीची रुग्णसंख्या 139 तर पर्वरीची रुग्णसंख्या 296 वर पोहोचली आहे. मयेची रुग्णसंख्या 81, कुडचडेची 86, काणकोणची 89 एवढी झाली आहे.
मडगावात सर्वाधिक 432 कोरोनाबाधित
मडगावचा नंबर अव्वल असून रुग्णसंख्या 432 आहे. वास्कोची रुग्णसंख्या 265 झाली आहे. वास्कोची स्थिती काही प्रमाणात दिलासादायक बनली आहे.
बाळ्ळीची रुग्णसंख्या 66 तर कासावलीची रुग्णसंख्या 104 झाली आहे. चिंचिणीची रुग्णसंख्या 39 तर कुठ्ठाळीची रुग्णसंख्या 139 झाली आहे. कुडतरीची रुग्णसंख्या 67 तर लोटलीची रुग्णसंख्या 91 झाली आहे. मडकईची रुग्णसंख्या 66 झाली आहे, तर केपेची रुग्णसंख्या 91 झाली आहे. सांगेची 75, शिरोडाची 94, धारबांदोडाची 100, नावेलीची 87 तर फोंडाची रुग्णसंख्या 358 झाली आहे. फोंडा सध्या हॉटस्पॉट ठरला असून रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
गोव्यात 9 सप्टेंबरपर्यंतचे कोरोनाबाधित : 22251
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 17156
उपचार घेणारे सक्रीय रुग्ण : 4833
9 सप्टेंबर रोजीचे नवे रुग्ण : 621
9 सप्टेंबर रोजी बरे झालेले रुग्ण : 281
9 रोजीचे मृत्यू : 6
आतापर्यंतचे मृत्यू : 262