प्रतिनिधी / मडगाव
मडगाव न्यू मार्केट खुलं करण्यासाठी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यानी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांकडे संपर्क साधला आहे. जिल्हाधिकाऱयांच्या मान्यते विना हे मार्केट काल सकाळी खुले करण्यात आल्यानंतर पोलिसांनी येऊन ते बंद केले.
सद्या मडगाव परिसरात अनेक जण वाहनातून तसेच रिक्षा तून छत्र्या, रेनकोट, प्लास्टिक व इतर पावसाळय़ात वापरतात आणल्या जात असलेल्या सामानाची विक्री करतात. त्यामुळे न्यू मार्केट मधील व्यापार्यांवर अन्याय होत असल्याने, व्यापार्यांना देखील पावसाळय़ातील सामान विक्री करण्याची मान्यता देण्यात यावी अशी मागणी न्यू मार्केट टेड्रस संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकार्याकडे केली. त्याप्रमाणे मुख्याधिकार्यानी तोंडी मान्यता दिली व मार्केट खुले करण्यात आले. मात्र त्याला जिल्हाधिकाऱयांची मान्यता नसल्याने ते पोलिसांनी येऊन बंद केले.
आता जिल्हाधिकार्याची मान्यता घेणार
दरम्यान, पालिकेच्या मुख्याधिकार्यानी न्यू मार्केट खुले करण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱयांशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. न्यू मार्केट मधील व्यापार्यांनी पावसाळय़ातील सामान खरेदी केले असून त्याची विक्री करण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे असे मत देखील जिल्हाधिकाऱयांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, वादळामुळे न्यू मार्केट मधील छताचे पत्रे उडून गेले होते. तसेच मोठय़ा प्रमाणात पडझड झाली होती. हे दुरूस्ती काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. हे काम लवकर पूर्ण करून व्यापार्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विनोद शिरोडकर यांनी केली आहे.