हातीद गावच्या तरुणीच्या कुटुंबाकडे सापडली चिठ्ठी !
मणेराजूरी / वार्ताहर
मणेराजुरी, येथे शेकोबा डोंगरावर एका युवकासह दोन तरुणींनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या प्रकरणाचे गूढ कायमच आहे; ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली होती; ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाल्याची चर्चा आहे. मात्र एक तरुण आणि दोन तरुणींनी एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे उलटसुलट चर्चा आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? या दृष्टीने तपास सुरु आहे पोलीसांनाही या प्रकरणाचा गुंता सोडविणेत अद्याप यश आले नाही. अनेक जण या तिहेरी आत्महत्येबद्दल चौकशी व माहिती घेत होते; परंतु या प्रकरणाबद्दल कोणतीच वाच्यता नसल्यामुळे गुंता वाढला आहे.
मात्र मयत शिवानी चंद्रकांत घाडगे रा. हातीद, ता . सांगोला या तरूणीच्या घरी चिठ्ठी सापडली आहे. तपासाच्या दृष्टीने त्यातील मजकूर कळू शकला नसला तरी शिवानी ही गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत हातीद गावात तिच्या घरी असल्याचे समजते, त्यानंतर पहाटे सहा वाजता ती मणेराजुरी येथील डोंगरावर मयत आढळली. शिवानी तीन तासात हातीद मधून कशी आली आणि तिला कुणी आणले, हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला असून लवकरच याचा उलगडा लवकरच होईल असे तासगाव पोलिसांनी आहे. एकूणच या प्रकाराने परिसरात व जिल्हाभर अनेक चर्चांना ऊत आला आहे.