कारवाई करण्याचा मुख्य निवडणूक अधिकाऱयांचा इशारा
प्रतिनिधी/पणजी
काही राजकीय पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी निवडणूक कामासाठी नेमलेल्या कर्मचाऱा, अधिकाऱयांना संपर्क साधून टपालाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याकरीता दबाव आणून किंवा धमकी देत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गोवा मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी †िदला आहे.
निवडणूक कार्यालयाने या संदर्भात एक नोटीस जारी केली असून मतदार, उमेदवार तसेच सर्वसंबंधितांनी लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मतदानाच्या गुप्ततेचे उल्लंघन करू नये. टपाल मतदान पध्दत सुरक्षित, बिनधोक असून त्यासाठी बक्षिसी किंवा लाच देणे, दबाव किंवा धमकी देणे हे प्रकार भ्रष्टाचारात मोडतात. हा गुन्हा असून त्यामुळे शिक्षा होऊ शकते, असे नोटिसीत म्हटले आहे.
कोणीही व्यक्ती मतदारावर मतदानासाठी दबाव आणून किंवा धमकी देत असल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिसीत बजावले आहे. मतदारांनी जागृत रहावे आणि याविषयी मुख्य निवडणूक अधिकरी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंद करावी व पुरावे द्यावेत तसेच 860-goa@eci.cov.in या ईमेलवर तक्रारी सादर करा, असे आवाहन निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
पोस्टल बॅलेटचा कालावधी कमी असावा : काँग्रेस
दरम्यान, पोस्टल बॅलेटवर प्रभाव टाकणाऱयांवर कारवाई करण्याच्या व त्या संदर्भात संबंधित अधिकाऱयांकडून अहवाल मागवण्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांच्या निर्णयाचे स्वागत करत, काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी पोस्टल बॅलेटसाठी दिलेला कालावधी कमी असावा, असे मत व्यक्त केले आहे.