विभागातील कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्याने खबरदारीची उपाययोजना
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका कार्यालय नागरिकांसाठी बंद आहे. तरी देखील कार्यालयातील कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्य कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील एका कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाला टाळे ठोकून येथील कामकाज दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
महापालिका कार्यालयात काम करणाऱया कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. कार्यालयात कर्मचाऱयांना लागण होऊ नये, याकरिता कार्यालयातील कामकाज बंद ठेवून नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच प्रवेशद्वारावर येणाऱया नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तरी देखील कार्यालयात काम करणाऱया दोन कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूवी क्वारंटाईन करण्यासाठी फिरणाऱया महसूल आणि अन्य विभागातील कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली होती. पण आता कार्यालयात काम करणाऱया कर्मचाऱयांना देखील लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
आतापर्यंत सहा अधिकारी व कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली होती. गुरुवारी आणखी एका कर्मचाऱयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या विभागात काम करणाऱया अन्य कर्मचाऱयांची तपासणी करण्यात आली आहे. कर्मचाऱयांचा अहवाल आल्यानंतर विभागातील कामकाज सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.