प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील अधिकाऱयांची बदली झाली होती. काही अधिकाऱयांची घरवापसी झाली असल्याने महापालिकेत रुजू झाले आहेत. महापालिकेचे महसूल उपायुक्त अद्याप रुजू झाले नाहीत. पण लवकरच रुजू होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, महसूल उपायुक्तांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा पोटनिवडणूक पार्श्वभूमीवर स्थानिक अधिकाऱयांची बदली अन्य जिल्हय़ात केली होती. प्रारंभी महापालिकेतील अधिकाऱयांची बदली अन्यत्र झाली नव्हती. मात्र, निवडणुकीचे कामकाज सुरू झाल्यानंतर कौन्सिल सेपेटरी, तसेच महसूल उपायुक्तांची बदली अन्यत्र केली होती. त्यांच्या पदी दुसऱया अधिकाऱयांची नियुक्ती केली होती. मात्र, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी तसेच महापालिकेतील कौन्सिल सेपेटरींची पुन्हा मूळ पदावर बदली झाली आहे. पण महसूल उपायुक्त अद्याप मनपात दाखल झाले नाहीत. महसूल उपायुक्तपदाचा कार्यभार महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांच्याकडे सोपविला होता. तरीही काही दिवसांपासून आजारी असल्याने कार्यालयात आले नाहीत. त्यामुळे महसूल उपायुक्त व महसूल अधिकारी दोघेही कार्यालयात उपलब्ध नाहीत.
सध्या महापालिका वॉर्डनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. सदर काम महसूल निरीक्षकांकरवी करून घेण्यात येत आहे. पण विभागप्रमुख नसल्याने साहाय्यक अधिकाऱयांकडून सर्व काम सुरू आहे. महसूल अधिकारी दाखल झाले नाहीत. पण त्यांच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तसेच मनपा अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये नाराजी आहे. ते मूळ पदावर रुजू झाले नाहीत, पण त्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी आहे.
महसूल उपायुक्तपदाचा कार्यभार सांभाळताना नागरिकांची कोणतीच कामे वेळेवर केली नाहीत. प्रत्येक कामाला विलंब करीत आहेत. खाते बदल प्रकरणी अनावश्यक कागदपत्रांची विचारणा करून नागरिकांची कामे करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे त्यांच्या कारभाराला मनपा कर्मचाऱयांसह नागरिक कंटाळले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची अन्य ठिकाणी बदली झाली आहे. त्यामुळे त्यांची महापालिकेत फेरनियुक्ती करू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. महसूल उपायुक्तांच्या कारभाराचा अनुभव महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनादेखील आला आहे.