प्रतिनिधी / पणजी
आज 17 रोजी माजी मुख्यमंत्री तथा माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या द्वितीय स्मृतिदिन आाखहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे हे पर्रीकर यांच्या मिरामार येथील स्मृतिस्थळी सकाळी 9 वाजता पुष्पांजली वाहतील. त्यानंतर 9.30 वाजता भाजपाच्या मुख्यालयात आयोजित आदरांजली कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 10 वाजता मिनेझिस ब्रागांझा येथे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळय़ास मुख्यमंत्री आणि प्रदेश्याध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.