प्रतिनिधी / बेळगाव
बेलदार छावणी, सदाशिवनगर येथील मरगाई देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक व देवस्थान कमिटीने स्वतः हा निर्णय घेऊन आपला निर्णय पोलीस अधिकाऱयांना कळविला आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मंगळवारी 14 जुलै रोजी मरगाई देवीची यात्रा होणार होती. कोरोना महामारीचा फैलाव वाढत चालला आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेऊन यात्रा कमिटीने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वतः पोलीस स्थानकात येऊन कळविला.
रविवारी सायंकाळी तेथील कार्यकर्ते एपीएमसी पोलीस स्थानकात जमले होते. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करणाऱया कार्यकर्त्यांचे कौतुक केले. कोरोना थोपविण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले.