प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा मंडळच्या नूतन कार्यकारिणीची बैठक नागेशराव झंगरूचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संस्थेच्या अध्यक्षपदी राजश्री नागराजू (हलगेकर) यांची फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी लक्ष्मणराव सैनुचे यांची एकमताने निवड झाली.
राजश्री नागराजू मागील 15 वर्षांपासून अध्यक्षपदाचा कार्यभार उत्तमप्रकारे सांभाळत आहेत. त्यांनी डेंटल इंजिनिअरिंग व फार्मसी कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची (एमडीएस, एम.टेक, एम.फार्म) संकल्पना मांडली आहे. उपाध्यक्षपदी निवड झालेले लक्ष्मण सैनुचे हे प्रभात कास्टींग हा व्यवसाय सांभाळत आहेत. मागील अनेक वर्षे ते कार्यकारी समितीवर असून यापूर्वीही त्यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. नुकतीच त्यांची बेळगाव कोल व कोक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
संस्थेची 89 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी 2020-21 ते 2022-23 या तीन वर्षांकरिता कार्यकारी समितीची निवड करण्यात आली. यामध्ये राजश्री नागराजू, सुहासराव चंदगडकर, लक्ष्मणराव सैनुचे, नागेशराव झंगरूचे, शंकरराव पाटील, दिनकरराव ओऊळकर, राजेश हलगेकर, शिवाजीराव पाटील, विनायक घसारी, परशराम गुरव, लक्ष्मीबाई चोळेकर, मलप्रभा शिंदे, मारुतीराव जाधव, मीना भारमल, इंद्रायणी पवार यांची एकमताने निवड करण्यात आली.