प्रतिनिधी / बेळगाव
मराठी विद्यानिकेतन शाळेच्यावतीने सानेगुरुजी स्मृतिदिन आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या शिक्षिका माया पाटील यांनी गुगल मीटच्या माध्यमातून सानेगुरुजींच्या कार्याचा आढावा घेतला.
प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जी. व्ही. सावंत यांच्या हस्ते झाले. शाळेचे मुख्याध्यापक आय. व्ही. मोरे, बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर, शीतल बडमंजी, शुभांगी माने उपस्थित होत्या.