पुणे
जर्मन लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सीडिझ बेंझने मंगळवारी आपल्या दोन नव्या कार्स सुव्ह गटात सादर केल्या आहेत. नवी जीएलए व एएमजी जीएलए 35 4 एम या कार्स भारतात सादर केल्या असून यांची किंमत 42 लाख रुपयांच्या पुढे असणार आहे. भारतातील सर्व विक्रेत्यांकडे या दोन्ही कार्स विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. सदरची गाडी ऑनलाइनही खरेदी करता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जीएलए ही कार एप्रिलमध्ये खरेतर लाँच व्हायची होती. पण कोरोनामुळे याला विलंब झाला.