वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफी मुर्तझा कोरोना बाधेतून पूर्णपणे बरा झाला असून 20 जूनपासून त्याच्यावर घरीच उपचार सुरू होते. आपली चाचणी निगेटिव्ह आल्याचे त्याने मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.
‘कोरोनाची लागण झाल्यानंतर माझ्यावर घरीच उपचार सुरू होते, त्यातून आता मी पूर्णपणे बरा झालो आहे. ज्यांना याची लागण झाली आहे, त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. अल्लावर भरवसा ठेवा आणि कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळा. आम्ही सर्वांनी एकत्र मिळून कोरोनाविरुद्ध लढा देऊ,’ असे त्याने या संदेशात म्हटले आहे. त्याची पत्नी सुमोना हकलाही कोरोनाची लागण झाली असून ती अद्याप त्यातून बरी झालेली नाही, असेही त्याने सांगितले.