८० नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले
प्रतिनिधी / सांगली
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरामध्ये सिरो सर्व्हिलन्स मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांनी ८० नागरिकांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी ताब्यात घेतले आहेत. आठवडाभारत त्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त होणार आहे. त्यानंत ऑगस्ट नंतर किती टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे, हे कळण्यास मदत होईल, अशी महिती महापालिका आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने आयसीएमआरकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रात अशी मोहीम तिसऱ्यांदा राबविण्यात येत आहे. मे महिन्यात पहिल्यांदा सिरो सर्व्हीलन्स करण्यात आले होते. यामध्ये अडीच टक्के लोकांच्या रक्तात कोविडचे नमुने सापडले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस करण्यात आलेल्या दुसऱ्या सिरो सर्व्हीलन्समध्ये 11 टक्के लोकांमध्ये कोविडचे नमुने आढळून आले होते.