प्रतिनिधी / महाबळेश्वर
दि 30-10 येथील बेल एअर संचालित मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयात भारतातील प्रख्यात पोटविकार तज्ञ,पद्मश्री डॉ अमित मायदेव यांच्या नेतृत्वाखाली मोफत पोट विकार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा, पद्मश्री डॉ अमित मायदेव, बेल एअरचे फादर टॉमी, जेष्ठ उद्योगपती जयसिंग मरीवाला, प्रांताधिकारी संगीता
राजापूरकर चौगुले, पर्यवेक्षाधिन अधिकारी मनिषा आव्हाळे,तहसीलदार सुषमा
पाटील,मुख्याधिकारी पल्लवी पाटील,डॉ राजीव शहा आदी उपस्थित होते महाबळेश्वर मधील दुर्गम डोंगरी भागामध्ये राहणाया गरीब गरजूना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार मिळावेत या उद्देशाने मोफत
पोट विकार आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आल्याचे पद्मश्री डॉ अमित मायदेव यांनी सांगितले मोफत आरोग्य मेळावा मध्ये पोट विकारांची तपासणी व दुर्बिणीद्वारे चाचणी मुंबईच्या तज्ञ डॉक्टरांकडून केली जाणार असून ऍसिडिटी,अल्सर,पोटदुखी,कोलायटिस,बद्धकोष्ठता,कर्करोग,कावीळ अश्या विविध पोटविकारांची तपासणी,सल्ला व उपचार या शिबिरामध्ये देण्यात आहेत 30 व 31 हे दोन दिवस हे शिबीरामध्ये आज पहिल्याच दिवशी 211 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 61 रुग्णांची मोफत एंडोस्कोपी करण्यात येणार आहे.पद्मश्री डॉ. अमीत मायदेव यांच्या संकल्पनेतली (‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’) भारतातील पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन देखील आज महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाहावयास मिळाली या फिरत्या केंद्रात अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर असून याची पाहणी देखील जिल्हाधीकारी शेखर सिंह यांनी केली व या उपक्रमाचे कौतुक केले.