प्रतिनिधी/ महाबळेश्वर
केंद्र शासनाकडुन लसींचा पुरेसा पुरवठा उपलब्ध होत नाही अशा वेळी लसीकरणासाठी शासनावर अवलंबुन न राहता राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी लस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे महाबळेश्वर पांचगणी पालिकांनी जर पुढाकार घेतला तर काही प्रमाणात नगरविकास विभागाच्या वतीने पालिकांना आर्थिक मदत दिली जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना एकनाथ शिंदे यांनी दिले
लसीकरणा बाबत निर्णय घेण्यासाठी आ मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील हॉटेल ड्मिलॅण्डच्या सभागृहात तालुक्यातील अधिकारी विविध संघटना लोकप्रतिनिधी व नागरीकांची एक महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत ना एकनाथ शिंदे हे बोलत होते या वेळी आ महेश शिंदे पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड उपनगराध्यक्ष अफजल सुतार पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील व विविध खात्यांचे अधिकारी नगरसेवक उपस्थित होते या बैठकीत बोलताना ना एकनाथ शिंदे म्हणाले की कोरोना मुळे सर्वांचीच अवस्था बिकट झाली आहे कोरोनाच्या दोन लाटा येवुन गेल्या आता काही दिवसांनी तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असल्याचेही तज्ञांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे अशा वेळी कोरोनाला रोखण्यासाठी नागरीकांचे 100 टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही थंड हवेची ठिकाणे आहेत पर्यटनावरच येथील स्थानिक लोकांचा उदरनिर्वाह अवलंबुन आहे या पेक्षा अधिक काळ ही पर्यटन स्थळे बंद राहणे हे येथील लोकांच्या दृष्टीने योग्य नाही ही पर्यटन स्थळे शक्य तितक्या लवकर उघडली पाहीजे या बाबत कोणाचे दुमत नाही पण हे केव्हा शक्य होईल जेव्हा येथील नागरीकांचे संपुर्ण लसीकरण होईल तेव्हा या साठी आता आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी लस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे महाबळेश्वर पांचगणी नगरपालिका व पंचायत समितीने या बाबत जर पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला तर काही प्रमाणात आपण लस खरेदी करण्यासाठी नगरविकास विभागाच्या वतीने लागणारी आर्थिक तरतुद करण्यात येईल आता शहरातील विविध संस्था दानशुर व्यक्ती यांनी देखिल आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही ना एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत बोलताना केले
राज्यातील बांधकामा परवाणगीचे नियमात बदल करण्यात आला आहे दिड हजार स्क्वेअरफुट घर बांधण्यासाठी आता कोणाच्या परवाणगीची गरज नाही तीन हजार फुटांपर्यंत दहा दिवसात परवाणगी देण्याची सक्ती संबंधित विभागांना करण्यात आली आहे जर दहा दिवसात परवाणगी दिली नाही तर डिम परवाणगीची तरतुद करण्यात आली आहे असे अनेक चांगले निर्णय आपण घेतले आहेत नियम व कायदे हे लोकांसाठी आहे परंतु त्याचा लोकांना फायदा झाला तरच नियमांचा उपयोग नाही कायदे केवळ पेपरवर असुन उपयोग नाही नगरविकास विभागाकडे गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले निर्णय आम्ही घेतले आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देखिल राज्य शासनाने भरपुर पैसा खर्च केला आहे आता या मध्ये लसीकरण हे महत्वाचे आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे आहे आपण शासनाकडुन आलेल्या निधीतुन विकास कामे करतो परंतु लोकांचा जीव सुरक्षित नसेल तर विकास कामांचा काय उपयोग अशा विकास कामांना काही अर्थ नाही म्हणुन लोकांचे जीव वाचविण्यासाठी प्राधान्य दिले पाहीजे जे काही करता येईल ते आपण करू नियमांची अडचण आली तर त्या नियमात कशी शिथीलता देता येईल ती आपण देवु असेही ना एकनाथ शिंदे यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले
या बैठकीला जिल्हा बॅकेचे संचालक राजेद्र राजपुरे पांचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर गट विकास अधिकारी नारायण घोलप माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर ता वैदयकिय अधिकारी डॉ अजित कदम माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे हॉटेल संघटनेचे अध्यक्ष कैलेश तेजाणी असिफ सयद तौफिक पटवेकर आदी मान्यवर उपस्थित होते
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे आणि त्या साठी आ मकरंद पाटील हे पुढाकर घेत असल्या बद्द्ल ना एकनाथ शिंदे यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आ मकरंद पाटील करीत असलेल्या प्रयत्नाला नागरीकांनी देखिल सहकार्य करून योगदान दयावे असे आवाहन ही ना एकनाथ शिंदे यांनी केले