ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात नव्या कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली दिसून आले. सोमवारी राज्यात 8 हजार 129 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 14 हजार 732 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.55%
दरम्यान, कालच्या दिवशी 200 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे सद्य स्थितीत राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.9 % इतके आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 56 लाख 54 हजार 003 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 95.55 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 1,47, 354 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
- 9 लाख 49 हजार 251 व्यक्ती होमक्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 82 लाख 15 हजार 492 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59 लाख 17 हजार 121 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 49 हजार 251 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 5 हजार 957 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.