ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण त्यातच राज्यातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासात 13 हजार 408 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 3 लाख 81 हजार 843 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 69.64 % आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 12,714 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 48 हजार 313 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 47 हजार 513 रुग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी दिवसभरात 344 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 18 हजार 650 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 3.4 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 29 लाख 8 हजार 887 नमुन्यांपैकी 4 लाख 31 हजार 719 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10 लाख 15 हजार 115 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 880 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.