ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात राज्यात 31,643 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. तर 102 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 27 लाख 45 हजार 518 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 54 हजार 283 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 20,854 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 23 लाख 53 हजार 307 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.71 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.98 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 3 लाख 36 हजार 584 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 94 लाख 95 हजार 189 नमुन्यांपैकी 14.08 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 16 लाख 07 हजार 415 क्वारंटाईनमध्ये असून, 16 हजार 614 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.