राजेंद्रप्रसाद मसुरकर,/ रत्नागिरी
कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘लोकसहभाग’ नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतो. ‘कोरोना’च्या साथीच्या काळात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना ठिकठिकाणच्या नागरिकांच्या व ग्रामस्थांच्या संस्था-संघटनांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहकार्याचा हात पुढे केला. शासकीय अधिकाऱयांबरोबर समन्वय साधून जिन्नस घरपोच करण्यापासून रूग्णांचे नातेवाईक बंदोबस्तावरील पोलीस यांची नाश्ता-भोजनाची सोय करण्यापर्यंत अनेक जबाबदाऱया उचलल्या. रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनीही जनतेच्या या सहकार्याची प्रशंसा केली.
असे असताना जिह्यातील मोजक्या शासकीय अधिकाऱयांनी स्वतःच्या ‘कर्तव्य तत्परतेचे’चे आणि अधिकारपदाच्या ताकदीचे नको इतके आणि नको त्या पध्दतीने दर्शन घडवण्याचे काम चालवले आहे. मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांचे उद्दाम वर्तन हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. पंधरा दिवसांपूर्वी मंडणगड येथील व्यापाऱयांनी या अधिकाऱयाच्या त्रासदायक वर्तनाबद्दल तक्रार केल्यानंतर वरिष्ठांनी समज देऊनही त्यांचे सामान्य नागरिक आणि समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्याबरोबर उध्दट वागणे जराही कमी झाले नाही. उलट 1 मे या ‘महाराष्ट्र दिनी’ एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱयाच्या गाडीवरील भगवा ध्वज ‘बापाच्या डोक्यावर लावा’ असा उर्मट सल्ला देऊन गाडीची नंबर प्लेटही आपल्या पोलीस सहकाऱयाकरवी तोडून टाकल्याची लेखी तक्रार मंडणगड येथील तहसीलदार व तालुका दंडाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.
सर्वत्र पसरलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये प्रशासनाला सहकार्य करणाऱया अनेक नागरिक व संस्थांपैकी ‘राजे प्रतिष्ठान मंडणगड’ ही एक. या संघटनांचे बत्तीस सदस्य तालुक्यातील सेवा कार्यात सहभागी आहेत. संघटनेचे अध्यक्ष योगेश जाधव या तक्रारीत म्हणतात, 1 मे 2020 महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या संघटनेचा एक सदस्य मंडणगड येथील पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱयाला दिलेल्या जेवणाचा रिकामा डबा आणण्यासाठी गेला होता. त्याच्या बाहेर उभ्या केलेल्या मोटारसायकलवर महाराष्ट्र दिनानिमित्त भगवा ध्वत लावला होता. शिंदे यांनी गाडीवर भगव्याचे चित्र असलेली नंबर प्लेट एका हवालदाराला तोडायला सांगितली आणि पॅन्सी नंबर प्लेट लावल्याबद्दल एक हजार रूपये दंड वसुल केला. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्याला आपल्या पॅबिनेटमध्ये बोलावून ‘मागे झेंडा पुढे झेंडा, झेंडे लावायचे असतील तर बापाच्या डोक्यावर झेंडे लावा, घरावर लावा’ असे सुनावले.
या अधिकाऱयाच्या विरोधात मंडणगडमधील असंतोष वाढत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली कोणालाही भर रस्त्यात अपमानकारक बोलणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, समोरच्या व्यक्तीचे वय, सामाजिक स्थान व प्रतिष्ठा यांचा विचार न करता सर्रास गुन्हेगारासारखी वागणूक देणे याविरोधात यापूर्वीही येथील जनतेने प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने या अधिकाऱयाचा उद्दामपणा वाढत चालला आहे. राज्यात भगव्याला आदराचे स्थान देणाऱया विचाराचे मुख्यमंत्री असताना अधिकारी महाराष्ट्र दिनीच भगव्याचा अनादर करण्याची हिम्मत कशी करतात असा सवाल लोक आपसातील चर्चेत उपस्थित करत आहेत.