ऑनलाईन टीम / नागपूर :
महाराष्ट्रातील नागपूर शहरामध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
भूकंपाचे केंद्र नागपूरमध्ये उत्तर पूर्वेपासून 95 किलोमीटर लांब होते. प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले असल्याची सूचना मिळाली नाही आहे.