ऑनलाईन टीम / लंडन :
देशातील शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात भारत जगात सहाव्या स्थानी आहे. वॅर्की फाउंडेशन या संस्थेच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
वॅर्की फाउंडेशनने जगातील 35 देशांचा सर्व्हे केला. प्रत्येक देशातील 1 हजार लोकांना वेगवेगळे प्रश्न विचारून शिक्षकांचा दर्जा आणि शिक्षकांबद्दलचे जनतेचे मत जाणून घेण्यात आले. त्याद्वारे संस्थेने तयार केलेला अहवाल ‘रिडिंग बिट्विन द लाइन्स : व्हॉट द वर्ल्ड रिअली थिंक्स ऑफ टीचर्स’ या नावाने या प्रसिद्ध करण्यात आला आहे.
कोरोना काळात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन वर्ग चालवताना शिक्षकांचे स्टेटस विद्यार्थी आणि पालकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न या संस्थेने केला. शिक्षक मूल्यमापनाच्याबाबतीत चीन, घाना, सिंगापूर, कॅनडा आणि मलेशिया भारताच्या पुढे आहेत.