ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 95 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 26 हजार 395 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 283 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या 26,395 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 2887 पोलीस अधिकारी आणि 23,508 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 24 हजार 595 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 2671 पोलीस अधिकारी आणि 21,924 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यात 1517 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 188 पोलीस अधिकारी आणि 1329 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 283 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 28 पोलीस ऑफिसर आणि 255 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.